Mumbai : मुंबईतील नोकरीच्या जाहिरातीवरून वाद; व्हायरल जाहिरातीवरून मराठी तरुण संतप्त

spot_img

मुंबईतील एका खासगी नोकरीच्या जाहिरातीमुळे नव्या वादाला सुरुवात झाली असून, रोजगार प्रक्रियेत भेदभाव केल्याचा आरोप करण्यात येत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या जाहिरातीत एका वरिष्ठ पदासाठी उमेदवारांची मागणी करताना विशिष्ट समाजातील उमेदवारांना प्राधान्य दिल्याचा उल्लेख असल्याचा दावा केला जात आहे. अहमदाबादस्थित एका भरती संस्थेने लोकप्रिय रोजगार संकेतस्थळांवर ही जाहिरात प्रसिद्ध केल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित पद अकाउंट्स आणि फायनान्स क्षेत्रातील असून चार्टर्ड अकाउंटंट (CA) पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी वार्षिक 20 ते 25 लाख रुपयांच्या पॅकेजची ऑफर देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

या जाहिरातीवर विविध मराठी संघटनांनी तीव्र आक्षेप घेत स्थानिक उमेदवारांना डावलले जात असल्याची भावना व्यक्त केली आहे. मुंबईसारख्या शहरात उपलब्ध असलेल्या उच्च पगाराच्या नोकऱ्यांमध्ये स्थानिक तरुणांना समान संधी मिळायला हव्यात, असे मत व्यक्त करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. रोजगारासाठी पात्रता आणि कौशल्य हेच निकष असावेत, समाज किंवा भाषेच्या आधारावर प्राधान्य देणे योग्य नसल्याचेही मत काही संघटनांनी मांडले आहे. दरम्यान, या वादग्रस्त जाहिरातीबाबत संबंधित कंपनी किंवा भरती संस्थेकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नसून, पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ