Beed : पुरुषोत्तमपुरीत गोदावरी नदीत 50 भाविकांची बोट पलटली !

spot_img

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे अधिक मास यात्रेदरम्यान गोदावरी नदीत भाविकांना घेऊन जाणारी बोट अचानक उलटल्याने मोठी खळबळ उडाली. दर्शनासाठी आलेल्या 40 ते 50 भाविकांनी भरलेली ही बोट नदी पार करत असताना अपघातग्रस्त झाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस, प्रशासन आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली आणि मदतकार्य सुरू करण्यात आले. वेळीच केलेल्या बचावकार्यामुळे बहुतांश भाविकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले, मात्र 10 ते 12 वर्षे वयोगटातील एक बालक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली असून त्याचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम सुरू आहे.

प्राथमिक माहितीनुसार, बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्याने हा अपघात घडला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. काही भाविकांनी बोट उलटल्यानंतर नदीच्या खोल पाण्यात अडकल्याचा अनुभव सांगितला असून, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. या घटनेनंतर यात्रास्थळी असलेल्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. बोटींमध्ये लाईफ जॅकेटची अपुरी व्यवस्था, प्रवाशांच्या संख्येवर नियंत्रणाचा अभाव आणि सुरक्षेच्या नियमांचे पालन झाले का, याबाबत चौकशीची मागणी होत आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबवण्याची तसेच या दुर्घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ