Chh. SambhajiNagar : गो सन्मानासाठी जनआवाहन केंद्रीय कायदा व मंत्रालय स्थापनेची मागणी

spot_img

जिल्हा प्रतिनिधी | विवेक चौधरी

देशभरात गोमातेच्या संरक्षण, संवर्धन, सेवा आणि राष्ट्रीय सन्मानासाठी सुरू असलेल्या “गो सन्मान आह्वान अभियान” अंतर्गत पंतप्रधान मा. श्री नरेंद्र दामोदरदास जी मोदी यांच्याकडे महत्त्वाचे स्मरणपत्र सादर करण्यात आले आहे. हे स्मरणपत्र जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र यांच्या माध्यमातून पाठविण्यात आले असून, देशभरातील नागरिकांच्या वतीने गोवंशाच्या संरक्षणासाठी प्रभावी पावले उचलण्याची मागणी करण्यात आली आहे.

स्मरणपत्रात नमूद करण्यात आले आहे की, संपूर्ण भारतात अखिल वेदलक्षणा गोमाता (संपूर्ण देशी गोवंश) यांची विधिवत सेवा, पूर्ण सुरक्षा आणि राष्ट्रीय सन्मान सुनिश्चित करण्यासाठी स्वतंत्र केंद्रीय कायदा करण्यात यावा. तसेच गोवंश संरक्षण, संवर्धन आणि व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी गो पालन मंत्रालय स्थापन करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

या अभियानाची पार्श्वभूमी स्पष्ट करताना नमूद करण्यात आले आहे की, २७ एप्रिल २०२६, सोमवार रोजी भारतातील ५१०० तहसीलांमधून सव्वा पाच कोटींपेक्षा अधिक नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांसह गोसेवा, सुरक्षा आणि सन्मानासाठी प्रार्थनापत्र सादर करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर अद्याप कोणतीही समाधानकारक कार्यवाही झालेली नसल्याने शासन-प्रशासनाला पुन्हा स्मरण करून देण्यासाठी हे स्मरणपत्र सादर करण्यात आले आहे.

स्मरणपत्रासोबत विविध परिशिष्टे जोडण्यात आली असून त्यामध्ये अभियानाचा संक्षिप्त परिचय, गोवंश संरक्षण, संवर्धन व व्यवस्थापनासाठी विस्तृत कार्ययोजना, कायदेशीर व संशोधनाधारित माहिती, अभियानाची कार्यपद्धती तसेच डिजिटल माध्यमातून संकलित करण्यात आलेल्या समर्थनाची माहिती समाविष्ट करण्यात आली आहे.

अभियानांतर्गत सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार, डिजिटल स्वरूपात १ संच तयार करण्यात आला असून, एकूण १०,१८५ पृष्ठे आणि २,७५,५२६ स्वाक्षऱ्यांची नोंद करण्यात आली आहे. पर्यावरण संवर्धन आणि कागदाची बचत या उद्देशाने संपूर्ण माहिती पेनड्राइव्हद्वारे सादर करण्यात आली असून, शासनाच्या आवश्यकतेनुसार मूळ हार्डकॉपी तत्काळ उपलब्ध करून देण्यात येईल, असेही स्मरणपत्रात नमूद करण्यात आले आहे.

गोवंश संरक्षण आणि राष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळावा, यासाठी देशभरातून नागरिकांनी व्यक्त केलेल्या भावनांचा शासनाने गांभीर्याने विचार करून आवश्यक निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा या स्मरणपत्राद्वारे व्यक्त करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ