Malshej Ghat : धबधब्यावर वर्षाविहारासाठी गेलेल्या दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू

spot_img

ओतूर,प्रतिनिधी:दि.२७ जुलै [ रमेश तांबे ]

माळशेज घाटातील काळू धबधब्यावर वर्षाविहारासाठी गेलेल्या दोन युवकांचा नदीच्या प्रवाहात पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दि.२५ रोजी घडली. पवन शाम साठे (वय १८) रा. मलकापूर, जि.बुलढाणा व रमण विजय अन्नापुरे (वय २०) रा.नांदेड अशी मृत पावलेल्या युवकांची नावे आहेत.

याबाबत टोकावडे पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक एस. नाईक म्हणाले की,शनिवार दि.२५ रोजी माळशेज घाटातील थितबी ता.मुरबाड,जि.ठाणे तसेच पुणे जिल्ह्याच्या सरहद्दीत हद्दित असलेल्या काळू धबधबा येथे हे दोन युवक वर्षाविहासाठी मित्रांच्या बरोबर आले होते. माळशेज घाटमाथ्यावर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे काळू धबधब्या व नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वाढला होता. या पाण्याच्या प्रवाहात हे दोन तरूण वेगवेगळ्या ठिकाणी वर्षाविहाराचा आनंद लुटत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला.

रमन अन्नापुरे हा तरूण एका ट्रेकिंग ग्रुप सोबत काळू धबधबा पाहण्यासाठी आला होता. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास वाघ्याच्या वाडीच्या हद्दीत काळू नदी पार करत असताना पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने तो नदीत वाहून गेला असल्याचे श्री नाईक यांनी  सांगितले. टोकावडे पोलीस तसेच स्थानिक ग्रामस्थ व रेस्क्यु टीमच्या सदस्यांनी दोन्ही तरूणांचे मृतदेह शोधून पाण्याबाहेर काढले.

[ पर्यटकांनी वर्षा विहाराचा आनंद लुटताना धोकादायक ठिकाणी जाणे टाळण्याचे.धबधब्यांवर फिरताना अतिउत्साह टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.धोकादायक किंवा असुरक्षित ठिकाणी सेल्फी काढणे किंवा स्टंट करणे टाळावे. पर्यटनाचा आनंद घेताना सुरक्षितता आणि स्वतःची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.धोकादायक ठिकाणी ट्रेक करणे टाळावे असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.]

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ