Share Market : शेअर बाजारात जोरदार कमबॅक; सेन्सेक्स ६०० अंकांनी तर निफ्टी २३,९०० पार!

spot_img

कच्च्या तेलाच्या घसरणीमुळे जागतिक बाजारासह देशांतर्गत बाजारात तेजीचे वातावरण; रुपयाही मजबूत.

गेल्या आठवड्यातील सततच्या घसरणीनंतर सोमवारी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात धमाकेदार तेजीने झाली. पश्चिम आशियातील तणाव ओसरल्यामुळे आणि कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट झाल्याने जागतिक बाजारांमध्ये सकारात्मक वातावरण पाहायला मिळाले, ज्याचा थेट फायदा देशांतर्गत बाजाराला झाला.

सकाळच्या सत्रात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा (BSE) सेन्सेक्स सुमारे ६०० अंकांनी वधारून ७६,६२४ वर व्यवहार करत होता, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा (NSE) निफ्टी ५० निर्देशांक २३,९३१ अंकांवर पोहोचला. सेन्सेक्समधील सर्व ३० शेअर्स हिरव्या रंगात उघडले. विशेषतः इंडिगो (इंटरग्लोबल एव्हिएशन), इन्फोसिस, बजाज फायनान्स आणि टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये मोठी वाढ नोंदवली गेली. याशिवाय, आयटी, मीडिया आणि एफएमसीजी क्षेत्रातही जोरदार खरेदी दिसून आली.

दुसरीकडे, कच्च्या तेलाच्या किमतीत ७ टक्क्यांहून अधिक घसरण होऊन ती प्रति बॅरल ८९ डॉलरच्या आसपास आली आहे. अमेरिका आणि इराणमधील लष्करी कारवाई थांबल्यामुळे बाजारात पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची सुरुवातही मजबूत झाली असून, या सकारात्मक घडामोडींमुळे गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ