Monsoon Care : पावसाळ्यात मुलांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी ‘या’ गोष्टींची नक्की घ्या काळजी

spot_img

पावसाळा हा ऋतू आल्हाददायक असला तरी या दिवसांत हवेतील दमटपणा आणि चिखलामुळे मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक ठरते. पावसाळ्यात सर्दी, खोकला आणि त्वचेचे आजार होण्याची शक्यता सर्वाधिक असते. त्यामुळे पालकांनी मुलांच्या कपड्यांची निवड करताना फॅशनपेक्षा आराम आणि स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे.

तज्ज्ञांच्या मते, या दिवसांत जड किंवा घट्ट कपडे घालणे टाळावे, कारण ते लवकर सुकत नाहीत आणि त्यामुळे त्वचेवर खाज किंवा पुरळ उठू शकते. त्याऐवजी कॉटन-ब्लेंड किंवा क्विक-ड्राय फॅब्रिकचे हलके कपडे आणि पूर्ण बाह्यांचे टी-शर्ट वापरावेत, जेणेकरून डासांपासून संरक्षण होईल. तसेच शाळेत जाताना वॉटरप्रूफ पादत्राणे आणि चांगल्या दर्जाचा रेनकोट वापरावा. मुले पावसात भिजल्यास त्यांना त्वरित कोरडे कपडे घालावेत आणि शाळेच्या बॅगेत नेहमी एक अतिरिक्त ड्रेस व टॉवेल ठेवावा. रात्री झोपताना नेहमी सैलसर आणि कोरडे कपडे द्यावेत. ओले मोजे किंवा दिवसभर ओले कपडे अंगावर ठेवू न देणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे, जेणेकरून मुलं आजारी पडणार नाहीत आणि पावसाचा आनंद घेऊ शकतील.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ