डोंनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धबंदीच्या घोषणेमुळे जागतिक बाजारात खळबळ ओसरली; मात्र भारतावर नवीन १० टक्के टॅरिफ लादल्याने खळबळ.
गेल्या काही काळापासून अमेरिका आणि इराणमधील तीव्र युद्धामुळे जगभरात महागाई आणि अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले होते. होर्मुज खाडी परिसरात सुरू असलेल्या या संघर्षामुळे कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडले होते, ज्याचा फटका भारतासह अनेक देशांना बसला. मात्र, अखेर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध थांबवण्याची घोषणा केली असून, त्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरांमध्ये सुमारे ६ टक्क्यांची मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. या निर्णयामुळे जागतिक स्तरावर मोठा दिलासा मिळाला असला, तरी दुसरीकडे ट्रम्प यांनी भारतावर १० टक्के नवीन टॅरिफ (आयात शुल्क) लादल्याची घोषणा केली आहे. युद्धबंदीनंतर अमेरिकेच्या या नव्या टॅरिफ धोरणामुळे आता आर्थिक वर्तुळात नवीन चर्चांना उधाण आले असून, ट्रम्प पुढील काळात काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




