MPSC Drug Inspector Paper Leak : पेपरची किंमत १२ लाख, ५ लाख अॅडव्हान्स आणि बार्शी कनेक्शन; रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेने राजकीय वर्तुळात खळबळ

spot_img

एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाची परीक्षा फुटल्याचा गंभीर आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी पेपर फुटीचे रॅकेट आणि त्याचे सविस्तर सादरीकरण करत खळबळजनक दावे केले आहेत. एका प्रश्नपत्रिकेची किंमत १२ लाख रुपये असून, ५ लाख रुपये अॅडव्हान्स आणि उरलेले ७ लाख नंतर देण्याचे ठरल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणामागे बार्शी कनेक्शन असून, पेपर सेट करणाऱ्यालाच मॅनेज करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. परीक्षा २२ मार्च रोजी होती, मात्र त्याआधीच २० मार्च रोजी व्हॉट्सॲपवर प्रश्नपत्रिका लीक झाल्याचे सांगत त्यांनी व्हॉट्सॲप चॅटचे पुरावेही समोर आणले. तसेच, एकाच नायब तहसीलदाराच्या दोन्ही मुलांना १४९ आणि १४८ सारखेच गुण कसे मिळाले? आणि कटऑफ १०५ असताना १०३ गुण असलेल्या उमेदवाराला मुलाखतीसाठी का बोलावले? असे अनेक सवाल उपस्थित करत रोहित पवारांनी या संपूर्ण भरती प्रक्रियेवर आणि यंत्रणेवर जोरदार प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ