Skin Re-wilding : सतत स्किनकेअर करून त्वचेला त्रास होतोय? ‘स्किन री-वाइल्डिंग’ ठरू शकतो नवा पर्याय

spot_img

सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी आजकाल अनेकजण विविध सीरम, टोनर, फेस मास्क, स्क्रब आणि इतर स्किनकेअर प्रॉडक्ट्सचा वापर करतात. सोशल मीडियावरील नव्या ट्रेंड्समुळे अनेकजण वारंवार आपले स्किनकेअर रूटीन बदलताना दिसतात. मात्र, गरजेपेक्षा जास्त प्रॉडक्ट्सचा वापर केल्याने त्वचेवर सकारात्मक परिणाम होण्याऐवजी नुकसान होण्याची शक्यता असते. कोरडेपणा, लालसरपणा, जळजळ आणि त्वचा निस्तेज दिसणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात.

अशा परिस्थितीत ‘स्किन री-वाइल्डिंग’ हा ट्रेंड सध्या चर्चेत आहे. या पद्धतीमध्ये काही काळ त्वचेला अतिरिक्त स्किनकेअरपासून विश्रांती दिली जाते. अनेक सीरम, अॅक्टिव्ह इंग्रेडिएंट्स, स्क्रब आणि फेस मास्क टाळून केवळ आवश्यक आणि सौम्य उत्पादनांचा वापर केला जातो. यामागचा उद्देश त्वचेच्या नैसर्गिक बॅरिअरला पुन्हा मजबूत होण्यासाठी वेळ देणे हा आहे.

सात दिवसांच्या साध्या रूटीनमध्ये सकाळ-संध्याकाळ सौम्य फेसवॉश, योग्य मॉइश्चरायझर आणि दिवसा सनस्क्रीनचा समावेश करता येतो. या काळात मेकअप कमी करणेही फायदेशीर ठरू शकते. वारंवार स्क्रब, अनेक सीरम एकत्र वापरणे, सतत फेस मास्क लावणे आणि चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळणे महत्त्वाचे आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ