Donald Trump : ‘इराणला मोठी किंमत मोजावी लागेल!’; सैनिकांच्या मृत्यूने भडकलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा

spot_img

होर्मुज खाडी बंद असल्याने जागतिक संकट गहिरे; कच्चे तेल महागल्याने युद्धाचे सावट आणखी तीव्र

इराण आणि अमेरिका यांच्यातील लष्करी संघर्ष आता अत्यंत धोकादायक वळणावर पोहोचला आहे. अमेरिकन सैनिकांचा या संघर्षात मृत्यू झाल्यानंतर संतप्त झालेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला गंभीर परिणाम भोगण्याचा थेट इशारा दिला आहे. दोन्ही देशांमधील हा वाद शिगेला पोहोचल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले असून, होर्मुजची सामुद्रधुनी बंद पडल्याने संपूर्ण जगावर मोठे आर्थिक संकट ओढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

२० जुलै २०२६ रोजी इराणने जॉर्डनच्या दिशेने क्षेपणास्त्रे डागल्यानंतर अमेरिकेकडूनही इराणवर सलग १० दिवस जोरदार प्रतिहल्ले सुरू आहेत. या संघर्षात अमेरिकेचे काही सैनिक मारले गेले असून, यावर बोलताना ट्रम्प यांनी “अमेरिकन सैनिकांच्या हत्येची इराणला मोठी किंमत मोजावी लागेल” अशी धमकी दिली आहे. दुसरीकडे, इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ने (IRGC) होर्मुजच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या दोन तेल टँकर्सचा स्फोट झाल्याचे सांगितले असून, अमेरिकन लष्कराच्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे हा अपघात झाल्याचा आरोप इराणने केला आहे.

या भीषण युद्धाचे पडसाद आता संपूर्ण आखाती देशांमध्ये उमटू लागले आहेत. अमेरिकेचे लष्करी तळ असलेल्या आखाती ठिकाणांवर इराणकडून सडेतोड उत्तर दिले जात असून, त्यात अमेरिकन सैन्याचे मोठे नुकसान होत आहे. विशेष म्हणजे युद्धविरामाची चर्चा अतिशय जवळ आलेली असतानाच दोन्ही देशांकडून हल्ल्यांची तीव्र ता वाढली आहे. होर्मुज खाडीचा मुख्य व्यापारी मार्ग बंद राहिल्याने जागतिक बाजारात तेलाची टंचाई निर्माण होऊन महागाईचा हाहाकार उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ