Raj Thackeray on Delhi LathiCharge : ‘सरकार मानसिक रुग्ण झालेय, त्यांनाच रुग्णालयात भरती करा!’; जंतरमंतरवरील लाठीमारावरून राज ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात

spot_img

अकार्यक्षम धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्याच’; ईव्हीएम, महागाई आणि दडपशाहीवरून मनसेप्रमुखांचे थेट आव्हान

नीट पेपरफुटीप्रकरणाविरोधात दिल्लीतील जंतरमंतरवर शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या बेछूट लाठीमारानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियाद्वारे केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. “सोनम वांगचुक यांना बळजबरीने फरफटत नेणे आणि निष्पाप आंदोलकांवर बेछूट लाठ्या चालवणे यावरून हे सरकार मानसिक रुग्ण झाले असून, त्यांनाच रुग्णालयात भरती करण्याची गरज आहे,” असा संतप्त टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे.

आपल्या पोस्टमध्ये सरकारवर निशाणा साधताना ते म्हणाले की, अकार्यक्षम शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात सरकारला स्वतःचे अपयश का वाटत आहे? जनतेचा आणि विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याची सवय सत्ताधाऱ्यांना लागली आहे, कारण ते जनतेच्या मतांवर नाही तर सरकारी यंत्रणा, मतदार याद्यांमधील गोंधळ आणि ईव्हीएमच्या जोरावर निवडून येतात. सध्याचे पंतप्रधान ‘लेम डक’ (Lam Duck) अवस्थेत असून, सत्ता राखण्याच्या उत्तराधिकाऱ्यांच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांचा आक्रोश निर्दयीपणे चिरडला जात आहे, अशी इतिहास नोंद ठेवेल.

राज ठाकरे यांनी पुढे म्हटले की, “हे आंदोलन केवळ एका परीक्षेपुरते मर्यादित नसून, महागाई, एकाच उद्योगपतीचे भले करणे, कंत्राटदारांसाठी जंगलतोड आणि शहरांचा झालेला संकोच याविरोधात जनतेच्या मनात साचलेल्या नैराश्यातून आलेला हा संताप आहे. २०११ चे ‘अरब स्प्रिंग’, श्रीलंकेतील विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि जयप्रकाश नारायण यांची ‘संपूर्ण क्रांती’ या सर्व ऐतिहासिक आंदोलनांचा पाया विद्यार्थ्यांचा असंतोषच होता.” त्यामुळे सरकारने निर्दयीपणा सोडून विद्यार्थ्यांशी ‘परीक्षा पे चर्चा’ नव्हे, तर त्यांच्या मागण्यांवर प्रत्यक्ष चर्चा करावी आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन परीक्षेमध्ये पारदर्शकता आणावी, अशी ठाम मागणी मनसेने केली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ