Prakash Ambedkar : दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाची धग महाराष्ट्रात; वंचित बहुजन आघाडीची २३ जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक

spot_img

दिल्लीतील जंतर-मंतर आणि संसद परिसरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटू लागले आहेत. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईनंतर विरोधी पक्षांनी या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली असून, विविध राजकीय नेते आणि संघटना आंदोलनाच्या समर्थनार्थ पुढे येताना दिसत आहेत. शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे, तर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

जंतर-मंतर येथे शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी आणि आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी समविचारी राजकीय पक्ष, विद्यार्थी संघटना आणि समाजातील विविध घटकांनी एकत्र येऊन महाराष्ट्र बंदला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले आहे. त्यामुळे दिल्लीतील आंदोलनाचा मुद्दा आता महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरणातही अधिक तीव्र होताना दिसत आहे.

दरम्यान, अहिल्यानगरमध्ये दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंबेडकरी कार्यकर्ते आणि विविध संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. रिमझिम पावसाची पर्वा न करता आंदोलकांनी आंदोलन सुरू ठेवत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी दिल्लीतील पोलिस कारवाईचा निषेध करण्यात आला तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

या आंदोलनामुळे दिल्लीतील विद्यार्थी प्रश्न आता देशव्यापी राजकीय मुद्दा बनताना दिसत असून, २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदला किती प्रतिसाद मिळतो आणि त्याचा राज्यातील राजकीय वातावरणावर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ