Rohit Pawar : भाजपसोबत जाण्यापेक्षा दुसरा पर्याय निवडू! रोहित पवारांचे पक्षाच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर मोठे विधान

spot_img

सुप्रिया सुळे आणि जयंत पाटलांनी शरद पवारांच्या उपस्थितीत विलिनीकरणाच्या वावड्या उडवल्यानंतर रोहित पवारांची आक्रमक भूमिका; राजकीय वर्तुळात खळबळबळ.

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे (शरद पवार गट आणि अजित पवार गट) विलिनीकरण होणार असून शरद पवारांचा गट राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत (NDA) सत्तेत सहभागी होऊ शकतो, अशा चर्चांना उधाण आले होते. या सर्व चर्चांना अखेर बुधवारी पूर्णविराम मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुख्य उपस्थितीत पक्षातील दिग्गज नेते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलिनीकरणाबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आपली भूमिका जाहीर करावी, अशी आग्रही मागणी केली. यावर खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शरद पवारांच्या समोरच पक्षाची भूमिका स्पष्ट करत दोन्ही पक्षांचे विलिनीकरण होणार नसल्याचे ठामपणे स्पष्ट केले. या संपूर्ण विषयावर स्वतः शरद पवारांनी मात्र कोणतीही थेट प्रतिक्रिया देणे टाळले. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीदरम्यान आमदार रोहित पवार यांनी केलेले एक वक्तव्य सध्या राजकीय क्षेत्रात अत्यंत वादळी ठरत आहे.

मुलाखती दरम्यान रोहित पवारांना प्रश्न विचारण्यात आला की, “सध्या विलिनीकरणाची चर्चा शांत झाली असली, तरी तुमचे इतर सहकारी नेते सरकारवर फारशी आक्रमक टीका करताना दिसत नाहीत. त्यामुळे मागच्या दाराने अजूनही चर्चा सुरू आहे का, अशी शंका लोकांना वाटते. समजा उद्या पक्षाचे विलिनीकरण झालेच आणि शरद पवार गट एनडीएसोबत गेला, तर तुमची वैयक्तिक भूमिका काय असेल?”

या अत्यंत रोखठोक प्रश्नाला उत्तर देताना रोहित पवार यांनी अत्यंत मोठे विधान केले. ते म्हणाले “जर उद्या अशी परिस्थिती आली आणि पक्षाचे विलिनीकरण होऊन आमचा गट एनडीएसोबत गेला, तरी **मी भाजपसोबत कधीही जाणार नाही.””अशा वेळी माझ्याकडे इतर अनेक पर्याय उपलब्ध असतील. मी त्या इतर पर्यायांचा विचार करेन आणि दुसरा मार्ग निवडेल.”

त्यांच्या या विधानानंतर पत्रकारांनी “दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का?” असा थेट उपप्रश्न विचारला, मात्र रोहित पवारांनी त्यावर अधिक भाष्य करणे टाळले. “मी माझा दुसरा योग्य पर्याय नक्कीच शोधेन, पण भाजपसोबत जाणार नाही,” या आपल्या भूमिकेवर ते ठाम राहिले. रोहित पवारांच्या या थेट भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील अंतर्गत राजकीय मतप्रवाह आणि आगामी रणनीतीबाबतच्या चर्चांना आता कमालीचा वेग आला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ