Entertainment : ‘आदर्श बाल विद्यालय’ 24 जुलैपासून प्राइम व्हिडिओवर; के. के. मेनन नव्या कॉमेडी मालिकेत झळकणार

spot_img

प्राइम व्हिडिओने आपल्या नव्या ओरिजिनल कॉमेडी मालिके ‘आदर्श बाल विद्यालय’च्या प्रदर्शनाची घोषणा केली असून, ही मालिका 24 जुलैपासून भारतासह जगभरातील 240 हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होणार आहे. हिमांक गौर दिग्दर्शित या सात भागांच्या मालिकेची निर्मिती पोशम पा पिक्चर्सच्या बॅनरखाली बिस्वपती सरकार आणि समीर सक्सेना यांनी केली आहे. कथालेखन बिस्वपती सरकार, अक्षय अस्थाना, नूपुर पाई, तत्सत पांडे आणि मेघना श्रीवास्तव यांनी केले असून, अभिनेता के. के. मेनन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यासोबत अर्चना पूरण सिंह, नवीन कस्तुरिया, प्रसन्ना बिष्ट, अभिमन्यु सिंह, देवेन भोजानी, अजितेश गुप्ता, अन्नपूर्णा सोनी आणि प्राची शाह यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. एका दुर्लक्षित आणि मोडकळीस आलेल्या शाळेला नवसंजीवनी देण्याचा ध्यास घेतलेल्या मुख्याध्यापकाच्या प्रवासाभोवती ही कथा फिरते. विद्यार्थ्यांचा गोंधळ, मर्यादित साधनसामग्री, पालकांचे कमी सहकार्य आणि प्रशासकीय अडथळे अशा अनेक संकटांवर मात करत शाळेचे भविष्य बदलण्याचा त्यांचा प्रयत्न या मालिकेत हलक्याफुलक्या विनोदासह भावनिक पद्धतीने मांडण्यात आला आहे. हिंदी भाषेत इंग्रजी सबटायटल्ससह प्रदर्शित होणारी ही मालिका मनोरंजनासोबतच प्रेरणादायी अनुभव देण्याचा प्रयत्न करणार आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ