Raj Thackeray on RJ Malishka : मुंबईच्या पावसावरून राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा; भाषणात आरजे मलिष्काच्या गाण्याचा उल्लेख

spot_img

मुंबईतील पावसाळी परिस्थिती, पाणी साचण्याच्या समस्या आणि नुकत्याच समोर आलेल्या मुंबई–पुणे मिसिंग लिंक प्रकल्पातील नुकसानाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकार आणि प्रशासनावर जोरदार टीका केली. आपल्या भाषणात त्यांनी २००५ मधील महापुराची आठवण करून देत, त्यावेळी झालेल्या टीकेची तुलना सध्याच्या परिस्थितीशी केली. कमी पावसातही मुंबईतील अनेक भाग जलमय होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याचवेळी २०१७ मध्ये आरजे मलिष्काने मुंबईतील पावसाळी समस्यांवर आधारित लोकप्रिय ठरलेल्या ‘मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय काय?’ या व्यंगात्मक गाण्याचा उल्लेख करत, अशा प्रकारचे प्रश्न विचारणारे आवाज आता कुठे आहेत, असा सवाल त्यांनी केला. सभेत उपस्थितांकडून मलिष्काने नवीन व्हिडिओ प्रसिद्ध केल्याची माहिती मिळाल्यानंतर राज ठाकरे यांनी त्यावरही प्रतिक्रिया देत, सत्ताधाऱ्यांवर टीका करणाऱ्या भूमिकेबाबत भाष्य केले. दरम्यान, मुसळधार पावसानंतर मुंबई–पुणे मिसिंग लिंक प्रकल्पावर दरड कोसळून वाहतूक विस्कळीत झाल्याच्या घटनेवरूनही त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत विकासकामांच्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ