Abhijeet Dipke : सोनम वांगचूक यांना रुग्णालयात हलवल्यानंतर अभिजीत दीपके आक्रमक; आमरण उपोषणाची घोषणा

spot_img

दिल्ली पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या आंदोलनाला नवे वळण मिळाले आहे. वांगचूक यांच्यासोबत आंदोलनात सहभागी असलेले कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी आजपासून आमरण उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आहे. तसेच, 20 जुलै रोजी संसद भवनाकडे मोर्चा काढण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. सकाळी दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान आंदोलनस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दीपके यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे पोलिसांनी आपल्याला मारहाण करून ताब्यात घेतल्याचा आरोप केला.

नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, या मागणीसाठी सोनम वांगचूक 28 जूनपासून आमरण उपोषणावर होते. आता वांगचूक यांना रुग्णालयात हलवल्यानंतर दीपके यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला असून, ही चळवळ आणखी व्यापक करण्याचे आवाहन त्यांनी समर्थकांना केले आहे. गेल्या काही दिवसांत विरोधी पक्षातील नेत्यांसह सामाजिक, राजकीय आणि बॉलिवूड क्षेत्रातूनही वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा वाढत असल्याचे दिसून आले होते.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ