Lifestyle : पावसाळ्यात डेंग्यू-चिकनगुनियाचा धोका वाढला; डासांपासून बचावासाठी ‘या’ गोष्टी नक्की करा

spot_img

पावसाळा सुरू होताच वातावरण आल्हाददायक होते, मात्र या ऋतूमध्ये डेंग्यू आणि चिकनगुनियासारख्या आजारांचा धोका वाढतो. पावसामुळे घराच्या आसपास, कुंड्यांच्या ट्रेमध्ये, कुलरमध्ये, जुन्या टायरमध्ये किंवा इतर वस्तूंमध्ये साचलेले स्वच्छ पाणी डासांच्या प्रजननासाठी पोषक ठरते. त्यामुळे घरात आणि परिसरात पाणी साचणार नाही, याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आठवड्यातून किमान एक दिवस ‘ड्राय डे’ पाळून पाण्याची भांडी, टाक्या आणि इतर कंटेनर रिकामे करून पूर्णपणे स्वच्छ व कोरडे करावेत. खिडक्यांना जाळ्या बसवणे, मच्छरदाणीचा वापर करणे आणि बाहेर पडताना पूर्ण शरीर झाकणारे कपडे घालणे फायदेशीर ठरते.

आवश्यकतेनुसार मॉस्किटो रिपेलेंट क्रीम किंवा रोल-ऑनचाही वापर करता येतो. यासोबतच शरीरातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी भरपूर पाणी प्यावे आणि व्हिटामिन C असलेली फळे, पालेभाज्या व पौष्टिक आहाराचा समावेश करावा. डेंग्यू किंवा चिकनगुनियाची लागण झाल्यास तीव्र ताप, डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे वेदना, सांधेदुखी आणि अंगावर पुरळ यांसारखी लक्षणे दिसू शकतात. अशी लक्षणे जाणवल्यास स्वतःहून औषधे घेण्याऐवजी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ