Otur News : गोवंशाची अवैध वाहतुक करणाऱ्या आरोपीस ठोकल्या बेड्या

spot_img

ओतूर,प्रतिनिधी:दि.१८ जुलै [ रमेश तांबे ] 

अहील्यानगर- कल्याण महामार्गावर डिंगोरे ता.जुन्नर जि.पुणे गावच्या हद्दीत गुरूवार दि.१६ रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास बस थांब्याजवळ संशयीतरित्या उभी असलेली मारूती  इको गाडी नंबर एम.एच. ०२ ई.सी.०७५६ ही संशयीतरित्या उभी असल्याची माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार गेंगजे यांना मिळाली त्यानंतर पोलीसांनी सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता, सदरच्या गाडीत बेकायदेशिररीत्या कत्तल केलेल्या जनावरांची मुंडके व जनावरांचे मांस आढळुन आले. सदरच्या गाडीचा चालक इरफान गणी शेख रा.दरोडी ता. पारनेर जि. अहील्यानगर यास पोलीसांनी त्याच्याकडील गाडीसह ताब्यात घेतले. त्यानंतर गाडीत मिळुन आलेल्या गोवंशाचे वजन केले असता त्यामध्ये १ लाख ३० हजार रूपये किमतीचे ६५० किलो गोवंशाचे मांस तसेच व दोन लाख ५० हजार रूपयांचे वाहन असे मिळून ३ लाख ८० हजार रू किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत पोलीस हवालदार सुरेश गेंगजे यांनी फिर्याद दिल्याने गाडी चालक १) इरफान गणी शेख रा. दरोडी ता. पारनेर जि. अहील्यानगर, तसेच गाडी मालक २) युसुफ इक्बाल शेख रा.आळकुटी ता.पारनेर जि. अहील्यानगर यांच्या विरूध्द ओतूर पोलीस स्टेशनमध्ये प्राण्यांना कुरतेने वागविण्यास प्रतीबंध अधि.१९६० चे कलम तसेच महाराष्ट्र पशुसंवर्धन सुधारीत कायदा कलमान्वये प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरच्या गुन्ह्याचा पुढील तपास ओतूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर बाजगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दिनेश साबळे हे करत असून गाडी चालक इरफान गणी शेख यास अटक करून मा. न्यायायासमोर हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलीस कस्टडी मिळाली असून गुन्ह्याचा सखोल तपास ओतूर पोलीस करत आहे.

सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल् अप्पर पोलीस अधीक्षक शुभमकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे, पोलीस हवालदार सुरेश गेंगजे, पोलीस हवालदार दिनेश साबळे, पोलीस हवालदार नामदेव बांबळे, पोलीस कॉन्स्टेबल मनोजकुमार राठोड, पोलीस कर्मचारी राजेंद्र आमले तसेच पोलीस मित्र रविराज चाळक यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ