Mumbai Sea : मुंबईत आज समुद्राला मोठी भरती; बीएमसीचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा

spot_img

मुंबईत आज समुद्राला मोठी भरती येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) नागरिकांना आणि पर्यटकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. भरतीच्या वेळी समुद्रात सुमारे 4.49 मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यता असल्याने किनारपट्टी परिसरात अनावश्यक गर्दी टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जोरदार वाऱ्यांसह समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने समुद्रकिनाऱ्यालगत धोकादायक ठिकाणी जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. तरीही उंच लाटांचा अनुभव घेण्यासाठी मरीन ड्राइव्ह आणि इतर समुद्रकिनाऱ्यांवर नागरिक व पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे.

संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी मरीन ड्राइव्ह परिसरात मुंबई पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली असून, नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले जात आहे. पोलिसांकडून सातत्याने गस्त घालून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.

प्रशासनाने नागरिकांना समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्याचे, धोकादायक ठिकाणी सेल्फी किंवा फिरण्यासाठी जाणे टाळण्याचे आणि अधिकाऱ्यांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ