Latur Pattern NEET Success : NEET 2026 मध्ये पुन्हा चमकला ‘लातूर पॅटर्न’; एमबीबीएस प्रवेशासाठी हजारो विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी

spot_img

वैद्यकीय प्रवेशासाठीच्या NEET 2026 परीक्षेत लातूरच्या प्रसिद्ध ‘लातूर पॅटर्न’ने पुन्हा एकदा आपला दबदबा सिद्ध केला आहे. पेपरफुटीच्या वादामुळे यंदाच्या निकालावर परिणाम होईल, अशी चर्चा असताना लातूरमधील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणवत्तेच्या जोरावर उल्लेखनीय यश मिळवत सर्व शंका दूर केल्या. विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळे लातूरच्या शिक्षण पद्धतीचा लौकिक पुन्हा एकदा देशभर अधोरेखित झाला आहे.

यंदाच्या निकालानुसार, राजर्षी शाहू महाविद्यालयातील 450 हून अधिक विद्यार्थ्यांना एमबीबीएस अभ्यासक्रमात प्रवेश मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संपूर्ण लातूरचा विचार करता, राज्यातील विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुमारे 1,200 ते 1,500 विद्यार्थी प्रवेश मिळवू शकतात, असा अंदाज शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. याशिवाय मोठ्या संख्येने विद्यार्थी खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्येही प्रवेश घेण्याची शक्यता आहे.

राजर्षी शाहू महाविद्यालयातून यंदा सुमारे 1,400 विद्यार्थ्यांनी NEET परीक्षा दिली होती. त्यापैकी आतापर्यंत 600 विद्यार्थ्यांच्या निकालाचे विश्लेषण पूर्ण झाले असून, त्यामध्ये 46 हून अधिक विद्यार्थ्यांनी 600 पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. तसेच 530 पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 200 हून अधिक असल्याची माहिती महाविद्यालय प्रशासनाने दिली आहे. उर्वरित विद्यार्थ्यांच्या निकालाचे विश्लेषण पूर्ण झाल्यानंतर ही संख्या आणखी वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

यंदाच्या परीक्षेत केवळ राजर्षी शाहू महाविद्यालयच नव्हे, तर दयानंद विज्ञान महाविद्यालय, रिलायन्स लातूर पॅटर्न, बसवेश्वर महाविद्यालय आणि संत तुकाराम महाविद्यालय या संस्थांतील विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय यश मिळवले आहे. या सामूहिक यशामुळे लातूरचा ‘लातूर पॅटर्न’ पुन्हा एकदा राज्यासह देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ