Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगर हादरले; बेपत्ता महिला आणि चिमुकल्याच्या हत्येप्रकरणी दोघांवर गुन्हा

spot_img

छत्रपती संभाजीनगरमधून दोन गंभीर घटनांनी खळबळ उडाली आहे. वाळूज परिसरातून बेपत्ता झालेल्या 26 वर्षीय सायमा चौधरी आणि तिच्या 14 महिन्यांच्या मुलाच्या हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिक येथील एका विहिरीत सायमाचा मृतदेह आढळून आला असून, कपडे आणि दागिन्यांच्या आधारे तिची ओळख पटवण्यात आली. प्राथमिक तपासानुसार आर्थिक व्यवहारातील वादातून सायमाची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचा संशय आहे, तर तिच्या लहान मुलाला वाहत्या पाण्यात फेकून दिल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात आर्थिक व्यवहाराशी संबंधित पुरावे तपासताना पोलिसांनी संशयित नुरजमा अहमद चौधरी आणि सद्दाम ऊर्फ आमीर चौधरी यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पैसे परत देण्याच्या कारणावरून सायमाला बोलावून कारमध्येच तिची हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. एमआयडीसी वाळूज पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमधील आणखी एका प्रकरणात पोलीस दलातील अधिकाऱ्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पोलीस उपनिरीक्षक हरीष खटावकर यांच्याविरोधात एका विवाहित महिलेने लैंगिक अत्याचार, ब्लॅकमेलिंग, मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याची तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, चार वर्षांपूर्वी झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

महिलेने पुढे आरोप केला आहे की, 15 जुलै रोजी आरोपीने तिला कारमध्ये बसवून मारहाण केली, तिचा मोबाईल हिसकावून घेतला आणि निर्जन ठिकाणी सोडून दिले. या तक्रारीच्या आधारे जवाहरनगर पोलीस ठाण्यात हरीष खटावकर यांच्याविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ