Bollywood : ३२ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुन्हा अनुभवता येणार ‘१९४२: अ लव्ह स्टोरी’; जॅकी श्रॉफ यांनी दिली गुड न्यूज

spot_img

८K रिझोल्यूशन आणि डॉल्बी ५.१ सराउंड साऊंडसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानासह हा क्लासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार

भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात काही चित्रपट आपल्या मना कोपऱ्यात कायमचे घर करून राहतात. असाच एक अजरामर आणि ऐतिहासिक चित्रपट म्हणजे ‘१९४२: अ लव्ह स्टोरी’. प्रेम, त्याग आणि प्रखर देशभक्तीची कथा मांडणारा हा क्लासिक चित्रपट ३२ वर्षांनंतर पुन्हा एकदा चित्रपटगृहात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी सोशल मीडियावर चित्रपटाच्या जुन्या आठवणींना उजाळा देणारे काही खास फोटो शेअर करत या पुनर्प्रदर्शनाची (Re-release) अधिकृत घोषणा केली. आजच्या नव्या पिढीलाही हा चित्रपट मोठ्या पडद्यावर एका वेगळ्या उंचीवर अनुभवता यावा, यासाठी हा विशेष निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

हा चित्रपट केवळ जसाच्या तसा पुन्हा प्रदर्शित केला जात नसून, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्याचे संपूर्ण पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. चित्रपटातील प्रत्येक फ्रेमवर बारकाईने काम करून रंगसंगती आणि दृश्य गुणवत्ता सुधारण्यात आली आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना आता हा चित्रपट भव्य ‘८K रिझोल्यूशन’मध्ये पाहता येईल. यासोबतच, यातील गाणी आणि संवाद अधिक प्रभावी वाटण्यासाठी ‘Dolby 5.1 Surround Sound’ चा वापर करण्यात आला आहे. जुन्या चाहत्यांना सुवर्णकाळाच्या आठवणीत घेऊन जाणारा आणि नव्या पिढीला भारतीय सिनेमाची ताकद दाखवणारा हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ