Entertainment : यशच्या ‘टॉक्सिक’ची बॉक्स ऑफिसवर दहशत; श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’च्या प्रदर्शनात होणार बदल?

spot_img

केजीएफ स्टार यशच्या बहुप्रतिक्षित ‘टॉक्सिक’ चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत असून, सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. बिग बजेट, दमदार स्टारकास्ट आणि भव्य सादरीकरणामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठा विक्रम करू शकतो, असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषक व्यक्त करत आहेत. सुरुवातीला ‘टॉक्सिक’चा सामना ‘धुरंधर 2’सोबत होणार होता. मात्र संभाव्य आर्थिक नुकसान टाळण्यासाठी निर्मात्यांनी रिलीजची रणनीती बदलत प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. आता याच पार्श्वभूमीवर श्रद्धा कपूरच्या बहुचर्चित ‘ईठा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबतही मोठी चर्चा सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘टॉक्सिक’सोबत थेट बॉक्स ऑफिस क्लॅश टाळण्यासाठी ‘ईठा’च्या निर्मात्यांकडून प्रदर्शनाची तारीख बदलण्याचा गंभीरपणे विचार सुरू आहे. चित्रपट ‘टॉक्सिक’च्या आधी किंवा काही दिवसांनी प्रदर्शित करण्याचा पर्याय समोर असल्याचे बोलले जात आहे. दोन्ही चित्रपटांकडून मोठ्या कमाईची अपेक्षा असल्याने एकाच दिवशी रिलीज झाल्यास त्याचा परिणाम कमाईवर होऊ शकतो, असे चित्रपटसृष्टीतील जाणकारांचे मत आहे. त्यामुळे योग्य रिलीज विंडो निवडण्यासाठी निर्मात्यांमध्ये चर्चा सुरू असून, याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘ईठा’च्या टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. श्रद्धा कपूरचा वेगळा लूक आणि 1940 ते 1990 या कालखंडातील कथानकामुळे चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली आहे. दुसरीकडे, ‘टॉक्सिक’मध्ये यशसोबत कियारा अडवाणी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार असून, या नव्या जोडीची केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. त्यामुळे आगामी काळात या दोन्ही चित्रपटांच्या अंतिम रिलीज डेटकडे संपूर्ण चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ