Sonam Wangchuk : ‘३ इडियट्स’मधील रँचोची भूमिका सोनम वांगचूक यांच्यावर आधारित नाही; आमिर खानचा मोठा खुलासा

spot_img

अभिनेता ओमी वैद्यच्या दाव्यानंतर आमिर खानने स्पष्ट केले की, चित्रपट बनवताना त्यांना वांगचूक यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हती

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आणि नीट पेपर घोटाळ्याच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतर-मंतर येथे गेल्या १९ दिवसांपासून उपोषणाला बसलेले प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना देशभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या ढासळत्या प्रकृतीवर चिंता व्यक्त करत ‘३ इडियट्स’ चित्रपटात ‘चतुर’ची भूमिका साकारणाऱ्या ओमी वैद्यने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. यात त्याने “आम्ही फुंगसूक वांगडूला मरताना पाहू शकत नाही” असे म्हणत, आमिर खानची रँचोची भूमिका सोनम वांगचूक यांच्यावरच आधारित असल्याचा दावा केला होता.

मात्र, आता स्वतः आमिर खानने यावर जाहीर स्पष्टीकरण देत हा केवळ एक गैरसमज असल्याचे म्हटले आहे. एका कार्यक्रमात बोलताना आमिरने सांगितले की, जेव्हा ‘३ इडियट्स’ चित्रपट बनवला जात होता, तेव्हा दिग्दर्शक राजकुमार हिरानी, लेखक अभिजात जोशी किंवा स्वतः त्याला, कोणालाच सोनम वांगचूक यांच्याबद्दल काहीही माहिती नव्हती; त्यामुळे ओमी वैद्यचा दावा चुकीचा आहे. वांगचूक यांच्या महान कार्याचे कौतुक करताना आमिर पुढे म्हणाला की, त्यांच्याबद्दल आदर वाटण्यासाठी त्यांचे नाव चित्रपटातील पात्राशी जोडण्याची गरज नाही आणि खुद्द वांगचूक यांनीही यापूर्वीच ही भूमिका आपल्यावर आधारित नसल्याचे स्पष्ट केले होते.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ