Navi Mumbai : नवी मुंबईत अपघातग्रस्त कारमधून अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त

spot_img

नवी मुंबईतील अक्षर सिग्नल परिसरात पहाटे घडलेल्या एका संशयास्पद अपघातानंतर पोलिसांच्या हाती मोठे घबाड लागले आहे. रात्रगस्तीवर असलेल्या पोलिस पथकाला रस्ता दुभाजकाला धडकलेली पांढऱ्या रंगाची MG हेक्टर कार आढळून आली. मात्र, अपघातानंतर कारमधील व्यक्ती घटनास्थळावरून पसार झाल्याने पोलिसांचा संशय अधिक गडद झाला. त्यानंतर वाहनाची सखोल तपासणी करण्यात आली असता कारमध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारच्या मागील सीटवर अंदाजे 10 ते 15 किलो अफूसदृश पदार्थ आढळला. याशिवाय डॅशबोर्डमध्ये एक पिस्तूल, सहा जिवंत काडतुसे आणि आणखी 20 ते 25 किलो संशयित अमली पदार्थ जप्त करण्यात आले. संपूर्ण मुद्देमाल ताब्यात घेऊन पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्याकडे सोपवण्यात आला असून, फरार झालेल्या संशयितांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे नवी मुंबई परिसरात मोठी चर्चा आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ