Crime News : बारामतीत दोन पोलिसांवर महिलेच्या लैंगिक शोषणाचा आरोप; भरतीत मदतीचे आमिष दाखवल्याचा दावा

spot_img

पुणे जिल्ह्यातील बारामतीमध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात एका महिलेने गंभीर आरोप करत तक्रार दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस भरती आणि बँड पथकातील भरती प्रक्रियेत अधिक गुण मिळवून देण्याचे तसेच नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवत तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या तक्रारीच्या आधारे बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात संबंधित दोन्ही पोलिसांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

आरोपींपैकी एक पोलीस उपनिरीक्षक अमरनाथ कुंभार हे दौंड येथील राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत असल्याची माहिती आहे, तर दुसरे आरोपी मारुती करे हे मुंबई पोलीस बँड पथकात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. या गंभीर आरोपांमुळे पोलीस दलाच्या प्रतिमेबाबतही प्रश्न उपस्थित होत असून, तपासातून समोर येणाऱ्या निष्कर्षांनुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ