Kolhapur : कोल्हापूरच्या यड्रावमधील पनीर कारखान्यावर FDA ची धाड !

spot_img

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहराजवळ असलेल्या यड्राव गावातील एका पनीर उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर शहापूर पोलिस आणि कोल्हापूर अन्न व औषध प्रशासनाने संयुक्तपणे कारवाई केली. अन्न सुरक्षा आणि उत्पादन प्रक्रियेशी संबंधित बाबींची पडताळणी करण्यासाठी ही धाड टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कारखान्यातील उत्पादनाची गुणवत्ता, स्वच्छता मानके तसेच अन्न सुरक्षा नियमांचे पालन होत आहे का, याची अधिकाऱ्यांनी तपासणी केली.

कारवाईदरम्यान संबंधित ठिकाणाहून आवश्यक नमुने आणि कागदपत्रांची पाहणी करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. तपास अहवालानंतरच कारखान्याविरुद्ध कोणती कारवाई केली जाणार याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. या कारवाईमुळे परिसरात चर्चा रंगली असून, अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत प्रशासन अधिक सतर्क झाल्याचे दिसून येत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ