Heatstroke Prevention Tips : कडक उन्हाळ्यात उष्माघातापासून वाचण्यासाठी तज्ज्ञांचे खास सल्ले; काय खावे आणि काय टाळावे?

spot_img

उन्हाळ्यात किरकोळ निष्काळजीपणा पडू शकतो महागात; डिहायड्रेशन आणि त्वचेच्या समस्या टाळण्यासाठी आयुर्वेदाचा सोपा मंत्र

महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या उष्णतेचा पारा प्रचंड वाढला असून अनेक ठिकाणी तापमान ४५°C च्या वर गेले आहे. या कडक उन्हात दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे देखील अशक्य झाले आहे. मात्र, कामाच्या निमित्ताने ज्यांना बाहेर पडावेच लागते, त्यांनी स्वतःची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. या दिवसांत आपल्या खाण्यापिण्यापासून ते कपड्यांच्या निवडीपर्यंत प्रत्येक गोष्टीकडे बारीक लक्ष देणे आवश्यक आहे. थोडीशी निष्काळजीपणा देखील डिहायड्रेशन (पाण्याची कमतरता), उष्माघात (Heat Stroke), उष्णतेचे पुरळ आणि त्वचा काळवंडणे (Suntan) यांसारख्या गंभीर समस्यांना कारणीbody ठरू शकते.

उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी शरीर आतून थंड आणि हायड्रेटेड (आर्द्र) ठेवणे आवश्यक आहे. यासाठी आयुर्वेद तज्ज्ञांनी दिलेल्या काही अत्यंत महत्त्वाच्या टिप्स खालीलप्रमाणे आहेत:

१. आहारात करा ‘या’ थंड पदार्थांचा समावेश

उन्हाळ्यात शरीराला थंडावा आणि आवश्यक पोषक तत्वे देणाऱ्या पदार्थांची गरज असते. तुमच्या रोजच्या आहारात काकडी, खरबूज, कलिंगड, दुधी, दोडका, कारले, टोमॅटो, पुदिना आणि कोथिंबीर यांचा जास्तीत जास्त समावेश करा.शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासाठी नुसते पाणी पिण्याऐवजी नारळ पाणी, ताक, बडीशेपचे सरबत, बेलफळाचे सरबत आणि कैरीचे पन्हे यांसारख्या घरगुती पेयांचा वापर करा. तसेच जेवणात कच्चा कांदा आणि हिरवी मिरची खाणे उष्माघातापासून संरक्षण करण्यासाठी फायदेशीर ठरते.

२. उन्हाळ्याच्या दिवसांत ‘या’ गोष्टी पूर्णपणे टाळा

उन्हाळ्यात चहा आणि कॉफीचे प्रमाण अत्यंत मर्यादित ठेवा.अनेकांना असे वाटते की कोल्ड ड्रिंक्समुळे आराम मिळतो, परंतु जास्त थंड पेये प्यायल्याने शरीरात डिहायड्रेशनचा धोका वाढतो. तेलकट, तिखट, मसालेदार आणि बाहेरील उघड्यावरील अन्न खाणे टाळा, कारण यामुळे या ऋतूत पचनक्रिया बिघडण्याची शक्यता जास्त असते.

उन्हाच्या तीव्र झळांपासून वाचण्यासाठी हलके, सुती (कॉटन) किंवा लिननचे सैल कपडे परिधान करा. हे कपडे घाम सहज शोषून घेतात आणि शरीराला आराम देतात. घट्ट आणि जाड कपडे घालणे टाळा. तसेच, घराबाहेर पडताना डोके आणि चेहरा रुमालाने किंवा छत्रीने झाकण्यास विसरू नका.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ