Crime News : ओतूर कॉलेज जवळील लॉजवर महिलेचा खून ?

spot_img

ओतूर,प्रतिनिधी;दि.१६ मे ( रमेश तांबे )

ओतूर कॉलेज जवळील असलेल्या अमृत लॉजवर शनिवारी एका ३१ वर्षीय महिलेचा मृतदेह ओतूर पोलिसांना मिळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत महिलेने आत्महत्या केली की, तिचा खून करण्यात आला याबाबत ओतूर परिसरात नागरिकांमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. याबाबत ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे माहिती देताना म्हणाले की,ओतूर कॉलेज येथील हॅाटेल अमृत लॅाज या ठिकाणी महिला स्नेहल सेजल अमुल शिंदे वय ३१ रा.पारगाव, ता.आंबेगाव,जि.पुणे ही महिला हॅाटेल अमृत लॉज मध्ये शनिवार दि.१६ रोजी मयत झाली असल्याची माहिती हॅाटेल मालक याने शनिवारी साडेअकरा वाजता दिली.

सदर माहिती मिळतच ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी लॉजच्या एका रूममध्ये सबधित महिला मृत अवस्थेत मिळून आली. ओतूर पोलिसांनी प्राथमिक खबर घेऊन,पंचनामा केला असून,घटनास्थळी जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांनी भेट दिली असून गुन्ह्याच्या ठिकाणी पोलीसांनी ‘मोबाईल फॉरेन्सिक वॅन बोलावण्यात आली आहे.

यापुर्वी देखील संबंधित लॉजचे मालक यांनी लॉजवर आलेल्या ग्राहकांची माहिती ठेवत नाही,देत नाही म्हणून,ओतूर पोलिसांनी लॉज मालकास नोटीस बजावली होती. तरीदेखील संबंधित लॉज मालक याने, लॉज मध्ये येणारे -जाणारे गिराईक यांचे कोणत्याच रजिस्टरला नोंद न घेता, तो प्रवेश देत होता. त्याला या पूर्वी पोलीसांनी नोटीस देऊनही,तो दिलेल्या सूचनांचे पालन करत नसल्याने त्याच्यावर पोलीस ठाण्यात बी एन एस २२३ प्रमाणे ओतूर पोलीसांनी दि.१७ जानेवारी २०२५ रोजी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ