spot_img

Kangana Ranaut on Uddhav Thackeray :  बीएमसीत सत्तांतर, ठाकरे बालेकिल्ल्याचा अंत; कंगना राणौतने उद्धव ठाकरेंना लगावला टोला

spot_img

२५ वर्षांची सत्ता संपुष्टात, भाजप-शिंदे सेनेची मुंबईत सत्ता; कंगनाने मोदी–फडणवीसांना दिल्या शुभेच्छा

बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालांनी मुंबईच्या राजकारणात ऐतिहासिक उलथापालथ घडवून आणली आहे. गेली तब्बल २५ वर्षे ठाकरे कुटुंबाच्या ताब्यात असलेली सत्ता यावेळी हातातून निसटली असून, भाजपने शिंदे गटाच्या शिवसेनेच्या मदतीने बीएमसीवर निर्णायक वर्चस्व मिळवले आहे. या निकालामुळे उद्धव ठाकरे यांचा बालेकिल्ला कोसळल्याचं स्पष्ट चित्र दिसत आहे.

या सत्तांतरावर देशभरातून प्रतिक्रिया उमटत असतानाच, सिनेअभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत हिची तीव्र आणि जळजळीत प्रतिक्रिया समोर आली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कंगनाने सरकारविरोधात थेट भूमिका घेतली होती. त्याच पार्श्वभूमीवर बीएमसी निकालानंतर कंगनाने समाधान व्यक्त केलं आहे.

भाजपच्या या मोठ्या विजयावर कंगना राणौतने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करत, “माझं घर तोडणारे आज सत्तेतून बाहेर फेकले गेले आहेत,” अशी स्पष्ट प्रतिक्रिया दिली. तीन दशकांपासून सत्तेत असलेली ठाकरे यांची राजकीय पकड पहिल्यांदाच तुटल्याचं ती म्हणाली.

कंगनाने यावेळी २०२० मधील त्या वादग्रस्त घटनेची आठवण करून दिली, ज्यावेळी मुंबई महापालिकेने तिच्या कार्यालयावर कारवाई केली होती. त्या प्रकरणात मुंबई हायकोर्टाने महापालिकेच्या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त करत, ती द्वेषपूर्ण असल्याचा ठपका ठेवला होता. याच घटनेचा संदर्भ देत कंगनाने “मला शिव्या घालणारे, धमक्या देणारे आणि घर पाडणारे आज जनतेने सत्तेबाहेर फेकले आहेत,” असं म्हणत आनंद व्यक्त केला.

दरम्यान, बीएमसी निकालानंतर कंगना राणौतचा उद्धव ठाकरे यांच्याविरोधातील २०२० मधील एक जुना व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कंगनाने “आज माझं घर पडलंय, उद्या गर्वाचं घर पडेल,” असा इशारा दिला होता. सध्याच्या निकालांमुळे हा व्हिडिओ पुन्हा चर्चेत आला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ