Copper or Steel : मुलांच्या डब्या-बातोल्यांसाठी कोणता धातू आहे सुरक्षित? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

spot_img

प्लास्टिक, तांबे की स्टील? मुलांच्या आरोग्यासाठी कोणत्या भांड्यांचा वापर करावा आणि कशामुळे होऊ शकते नुकसान? जाणून घ्या सविस्तर.

शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी आकर्षक आणि रंगीबेरंगी डबे किंवा वॉटर बॉटल निवडताना पालक अनेकदा केवळ सौंदर्याला प्राधान्य देतात. मात्र, तज्ज्ञांच्या मते, मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी डब्यांचा धातू अत्यंत महत्त्वाचा असतो. बाजारात मिळणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये गरम अन्न किंवा पाणी ठेवल्यास त्यातून ‘बीपीए’ (BPA) सारखी घातक रसायने पाझरतात, ज्यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणा आणि हार्मोनल बिघाडासारख्या समस्या उद्भवू शकतात. तसेच प्लास्टिकच्या खराब झालेल्या भांड्यांमध्ये बॅक्टेरिया होऊन इन्फेक्शनचा धोका वाढतो.

दुसरीकडे, तांब्याच्या बाटलीत पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले असले तरी त्यात लिंबू पाणी, ज्यूस किंवा कोणतेही आंबट पेय ठेवल्यास मुलांना पोटदुखी किंवा उलट्यांचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते, मुलांसाठी ‘स्टील’ हा सर्वोत्तम पर्याय आहे. स्टीलची भांडी मजबूत, टिकाऊ आणि दुर्गंधीमुक्त असतात. यात ठेवलेले अन्न आणि पाणी पूर्णपणे सुरक्षित राहते, ज्यामुळे मुलांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. पालकांनी मुलांसाठी स्टीलच्या डब्यांचा आणि बाटल्यांचाच वापर करावा, असा सल्ला यात दिला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ