Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या जागी कोणाची वर्णी लागणार? 

spot_img

राज्यसभेतील रिक्त झालेल्या 24 जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली असून, 18 जून रोजी मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रासह देशातील 10 राज्यांमध्ये खासदारांच्या निवृत्ती आणि काही सदस्यांच्या राजीनाम्यांमुळे या जागा रिक्त झाल्या आहेत. महाराष्ट्रात उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या जागेसाठी आता पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून या जागेसाठी कोणाला उमेदवारी दिली जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी 8 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर 18 जून रोजी मतदान होऊन त्याच दिवशी मतमोजणी आणि निकाल जाहीर केला जाणार आहे. सुनेत्रा पवार यांच्या रिक्त जागेसाठी पक्षांतर्गत हालचालींना वेग आला असून, अनेक इच्छुकांकडून लॉबिंग सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेसाठी अखेर कुणाची निवड होते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ