Karuna Munde : मंत्री झिरवळांच्या त्या व्हिडीओ वरून करुणा मुंडेंचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप

spot_img

नरहरी झिरवळ यांच्या कथित व्हिडीओ प्रकरणात आता नवीन वळण आले आहे. या व्हिडीओबाबत आधीच मोठा वाद निर्माण झाला असताना, करुणा मुंडे यांनी यासंदर्भात धक्कादायक दावा केला आहे.

करुणा मुंडे यांनी आरोप केला की, हा व्हिडीओ धनंजय मुंडे यांनीच व्हायरल केला. मंत्रिपद मिळवण्याच्या घाईत त्यांनी हे पाऊल उचलल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ उडाली आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करत त्यांनी राज्य सरकारकडे SIT आणि CBI चौकशीची मागणी केली आहे. तसेच धनंजय मुंडे यांची नार्को टेस्ट करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.

याशिवाय, करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर वैयक्तिक स्वरूपाचेही गंभीर आरोप केले. त्यांनी आर्थिक व्यवहार, कुटुंबीयांची संपत्ती आणि काही जुन्या घटनांबाबत प्रश्न उपस्थित करत संपूर्ण कुटुंबाची चौकशी करण्याची मागणी केली.

दरम्यान, या सर्व आरोपांमुळे झिरवळ व्हिडिओ प्रकरण आणखी गुंतागुंतीचे बनले असून, आता या प्रकरणात पुढे काय घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ