Virat Kohli Instagram Controversy : विराटला बदनाम करण्यासाठी कोट्यवधींची ऑफर! जर्मन मॉडेल लिजलाजचा खळबळजनक खुलासा

spot_img

‘तो माझा लाडका क्रिकेटर, मी पैशांसाठी खोटे बोलणार नाही’; इन्स्टाग्राम ‘लाईक’ वादानंतर मॉडेलने पत्रकारांचे वाभाडे काढले

भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार विराट कोहली सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला असून, या प्रकरणाला आता एक धक्कादायक वळण मिळाले आहे. काही दिवसांपूर्वी विराटच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून जर्मन मॉडेल आणि इन्फ्लुएन्सर लिजलाज (LizLaz) हिच्या एका जुन्या फोटोवर ‘लाईक’ करण्यात आले होते. विराट तिला फॉलो करत नसतानाही हे लाईक आल्याने सोशल मीडियावर मीम्स आणि चर्चांचा पूर आला होता. मात्र, आता स्वतः लिजलाजने यावर मौन सोडले असून एक खळबळजनक कबुली दिली आहे. एका मुलाखतीत तिने दावा केला की, विराट कोहलीच्या विरोधात खोटे बोलण्यासाठी आणि त्याला बदनाम करण्यासाठी काही पत्रकारांनी तिला मोठी रक्कम ऑफर केली होती. “काही लोकांनी मला अशा गोष्टींचे आरोप करण्यास सांगितले जे विराटने कधी केलेच नाहीत, पण मी एकही रुपया घेतला नाही आणि कधी घेणारही नाही,” असे तिने स्पष्टपणे सांगितले.

लिजलाजने या मुलाखतीत विराटचे समर्थन करताना त्याला आशियाचा ‘मेस्सी किंवा रोनाल्डो’ असे संबोधले. ती म्हणाली की, विराट तिचा अत्यंत आवडता क्रिकेटपटू आहे आणि प्रसिद्धी किंवा पैशांसाठी ती कधीही कोणाची प्रतिमा मलीन करणार नाही. ज्या दिवशी विराटने तिचा फोटो लाईक केला, त्या दिवशी अचानक फोन आणि मेसेजेसचा वर्षाव झाल्यावर तिला या प्रकरणाच्या गांभीर्याची जाणीव झाली. मुळात हा वाद तेव्हा सुरू झाला जेव्हा विराटच्या अकाउंटवरून लिजलाज आणि फोटोग्राफर अद्वैत वैद्य यांच्या जुन्या फोटोवर लाईक दिसले. यापूर्वी २०२५ मध्येही अभिनेत्री अवनीत कौर हिच्या फोटोबाबत असाच प्रकार घडला होता, तेव्हा विराटने ‘अल्गोरिदममधील तांत्रिक चुकीमुळे’ हे घडल्याचे स्पष्टीकरण दिले होते. यावेळीही चाहत्यांनी त्याच ‘अल्गोरिदम’ची आठवण काढली असली, तरी लिजलाजच्या या नव्या खुलाशामुळे विराटला जाणीवपूर्वक गोवण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ