Sonam Wangchuk Petition Rejected : सोनम वांगचुक यांच्या पत्नीची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली; खासगी रुग्णालयात हलवण्याची मागणी नामंजूर

spot_img

पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना त्यांच्या पसंतीच्या खासगी रुग्णालयात हलवण्याची मागणी दिल्ली उच्च न्यायालयाने मान्य केलेली नाही. सोनम वांगचुक यांच्या पत्नी डॉ. गीतांजली आंग्मो यांनी दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे सध्या त्यांच्यावर सुरू असलेल्या वैद्यकीय उपचारांमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

याचिकेत दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतरमंतर परिसरातून त्यांच्या इच्छेविरुद्ध सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच त्यांना तातडीने त्यांच्या पसंतीच्या खासगी रुग्णालयात हलवावे आणि पुढील उपचारांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना द्यावा, अशी मागणी करण्यात आली होती.

या प्रकरणाची सुनावणी दुपारी अडीच वाजता सुरू झाली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने पत्नीच्या याचिकेवर विचार केल्यानंतर ती अमान्य केली. त्यामुळे सोनम वांगचुक यांना सध्या सफदरजंग रुग्णालयातच वैद्यकीय उपचार घ्यावे लागणार आहेत.

या निर्णयाकडे सामाजिक कार्यकर्ते, नागरिक आणि वांगचुक यांच्या समर्थकांचे विशेष लक्ष लागले होते. न्यायालयाच्या निर्णयानंतर या प्रकरणावर पुन्हा एकदा देशभरात चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः एखाद्या व्यक्तीच्या उपचारांबाबतचा निर्णय, त्याची वैयक्तिक पसंती आणि प्रशासनाची भूमिका यावरून या प्रकरणाने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ