Sachin Tendulkar Birthday : वडिलांना शुभेच्छा देताना अर्जुनचा केक खाण्यास नकार; फिटनेसला दिलं प्राधान्य

spot_img

‘गॉड ऑफ क्रिकेट’ म्हणून ओळखले जाणारे सचिन तेंडुलकर आज (२४ एप्रिल) आपला वाढदिवस साजरा करत आहेत. क्रिकेटविश्वातील दिग्गज खेळाडू असलेल्या सचिनने ५३ व्या वर्षात पदार्पण केलं असून, देशभरातून चाहत्यांसह आजी-माजी क्रिकेटपटू त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. सोशल मीडियावरही सचिनच्या चाहत्यांकडून विशेष पोस्ट्स आणि आठवणी शेअर केल्या जात आहेत.

दरम्यान, सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यानेही आपल्या वडिलांना वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा दिल्या. मात्र, त्याच्या शुभेच्छांपेक्षा त्याने घेतलेला एक निर्णय सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. सध्या सुरू असलेल्या IPL 2026 मध्ये अर्जुन ‘लखनऊ सुपर जायंट्स’ संघाकडून खेळत आहे. या संघाने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अर्जुनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये अर्जुन तेंडुलकर एका प्लेटमध्ये ठेवलेला केक हातात घेत आपल्या वडिलांना शुभेच्छा देताना दिसतो. वाढदिवसाचा आनंद व्यक्त करताना तो केक खाण्यास मात्र नकार देतो. यामागचं कारणही त्याने स्पष्ट केलं आहे. “मी सध्या साखरेचं सेवन पूर्णपणे बंद केलं आहे, त्यामुळे केक खाऊ शकत नाही,” असं तो म्हणतो. त्यानंतर लवकरच भेटू, असं सांगत तो व्हिडिओ संपवतो.

वडिलांचा वाढदिवस असतानाही आपल्या आहाराच्या नियमांमध्ये तडजोड न करणारा अर्जुनचा हा निर्णय अनेकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. फिटनेस आणि शिस्त यांना प्राधान्य देणाऱ्या या भूमिकेचं काहींनी कौतुक केलं आहे, तर काहींना त्याचा हा वेगळा दृष्टिकोन आश्चर्यचकित करणारा वाटत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ