Annu kapoor : ‘मिल्की फिगर’ कमेंटवर अन्नू कपूर यांचं ट्रॉलर्सला सडेतोड उत्तर

spot_img

“इंग्रजीत म्हटलं असतं तर चाललं असतं का?”; भाषेच्या दुटप्पीपणावर बोट ठेवत व्यक्त केली नाराजी

हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर सध्या त्यांच्या एका वादग्रस्त विधानामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या ‘आज की रात’ या गाण्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी तिच्या शरीरयष्टीचा उल्लेख ‘मिल्की फिगर’ असा केला होता, ज्यावरून सोशल मीडियावर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. ७० वर्षांच्या अभिनेत्याला अशा शब्दांत कौतुक करणे शोभते का, असा सवाल नेटकऱ्यांनी विचारला होता. आता या संपूर्ण वादावर अन्नू कपूर यांनी आपली बाजू मांडली असून, टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे.

एका मुलाखतीत बोलताना अन्नू कपूर म्हणाले की, “जर मी हेच विधान इंग्रजीत ‘मिल्की बॉडी’ असं म्हटलं असतं, तर कोणालाही अडचण आली नसती; पण मराठी किंवा हिंदीत बोलल्यावर लोकांना ते टोचतं.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, तमन्ना ही त्यांच्या मुलीच्या वयाची असून तिचे कौतुक करताना त्यांच्या मनात कोणतीही कामुक भावना किंवा ‘लस्ट’ नव्हती. एखाद्या आलिशान गाडीचं कौतुक करणं आणि तिचा मोह धरणं यात जसा फरक असतो, तसाच हा प्रकार असल्याचं त्यांनी नमूद केलं. विशेष म्हणजे, जर तमन्नाला माझ्या शब्दांमुळे वाईट वाटलं असेल, तर मी तिची माफी मागून तिच्या पाया पडायलाही तयार आहे, असे भावूक उद्गार त्यांनी काढले आहेत. आपल्या विधानामागे कोणताही चुकीचा हेतू नव्हता, हे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ