डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरला कथित मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले नगरसेवक रमेश म्हात्रे यांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. प्रकृती अस्वस्थ झाल्याने आणि उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवल्यामुळे त्यांच्यावर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दोन दिवस उपचार करण्यात आले होते. उपचार पूर्ण झाल्यानंतर आता त्यांना न्यायालयात सादर केले जाणार असून, त्यांच्या कोठडीबाबत, जामिनाबाबत किंवा इतर कोणता कायदेशीर निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
डॉक्टरवर झालेल्या कथित हल्ल्याच्या घटनेनंतर राज्यभरातील वैद्यकीय क्षेत्रातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून, संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी विविध डॉक्टर संघटनांनी केली आहे. दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार पुढील कायदेशीर प्रक्रिया राबवली जाणार आहे.




