Pune Crime : जखमी रुग्णाला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्सला भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू

spot_img

अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात ॲम्बुलन्स चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जुन्नर तालुक्यातील गायमुखवाडी परिसरात शुक्रवारी (17 रोजी) मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास रुग्णाला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्सची आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाली. या दुर्घटनेत ॲम्बुलन्स चालक कुणाल तुकाराम डुंबरे (वय 31, रा. डुंबरवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे) यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, कुणाल डुंबरे हे एमएच 14 एलबी 4329 क्रमांकाच्या ॲम्बुलन्समधून खामुंडी येथील अपघातग्रस्त रुग्णाला उपचारासाठी आळेफाटा येथे घेऊन जात होते. यावेळी अहिल्यानगरकडून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या एमएच 24 बीडब्ल्यू 2092 क्रमांकाच्या पिकअप वाहनाने समोरून येत ॲम्बुलन्सला जोरदार धडक दिली.

पिकअप चालक नीलकंठ फुलचंद गव्हाणे (रा. शिराळा, ता. जि. लातूर) याने वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे आणि वेगाने वाहन चालवल्याने हा अपघात झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. धडकेत कुणाल डुंबरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मात्र, उपचारासाठी नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात ॲम्बुलन्सचेही मोठे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. पोलिसांनी दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी शेखर तुकाराम डुंबरे यांच्या फिर्यादीवरून पिकअप चालक नीलकंठ गव्हाणे याच्याविरोधात ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बांबळे करत आहेत.`

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ