Shaina NC : शिवसेना प्रवक्त्या शायना एनसी यांचे व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक; नावाचा गैरवापर करून पैशांची मागणी

spot_img

शिवसेना प्रवक्त्या शायना एनसी यांचे व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अज्ञात व्यक्तीने त्यांच्या अकाउंटचा ताबा घेत त्यांच्या नावाने संपर्कातील लोकांना संदेश पाठवून आर्थिक मदतीच्या स्वरूपात पैशांची मागणी केल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सायबर हल्लेखोराने शायना एनसी यांच्या व्हॉट्सअॅप अकाउंटचा गैरवापर करत त्यांच्या परिचित, कार्यकर्ते आणि इतर संपर्कांना मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. या संदेशांद्वारे पैशांची मागणी करण्यात येत असल्याने फसवणुकीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या प्रकाराची माहिती मिळताच शायना एनसी यांनी नागरिकांना आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावरून कोणतीही आर्थिक मदत किंवा पैशांची मागणी झाल्यास त्यावर विश्वास ठेवू नये आणि कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या घटनेची माहिती सायबर यंत्रणांना देण्यात आली असून, अकाउंट हॅक करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहावे आणि संशयास्पद संदेशांना प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ