Petrol, Diesel Price : जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरले; भारतात मात्र पेट्रोलच्या किमती अद्यापही स्थिर

spot_img

आंतरराष्ट्रीय पातळीवर इंधनाचे दर कमी होऊनही देशातील ग्राहकांना दिलासा मिळेना

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत होती. मात्र, आता हे चित्र बदलले असून कच्चे तेल प्रति बॅरल १०० डॉलरच्या खाली आले आहे. यामुळे जागतिक पातळीवर पेट्रोल सरासरी १४७.९० रुपयांवरून थेट १४५.९९ रुपये प्रति लीटरवर घसरले असून, आंतरराष्ट्रीय बाजारात इंधन जवळपास ३७.२८ रुपयांनी स्वस्त झाले आहे. या घसरणीचा फायदा घेत भारताच्या शेजारील देश जसे की चीन, नेपाळ आणि पाकिस्तान यांनी जून महिन्यात आपल्या देशात पेट्रोलचे दर कमी करून जनतेला मोठा दिलासा दिला आहे. पाकिस्तानमध्ये दर १३९.४१ रुपयांवरून १३०.८२ रुपयांवर, तर चीन आणि नेपाळमध्येही किमतीत कपात करण्यात आली आहे.

दुसरीकडे, जागतिक बाजारात एवढी मोठी घसरण झालेली असतानाही भारतात मात्र पेट्रोल आणि डिझेलचे दर अद्याप स्थिर आहेत. सध्या भारतात पेट्रोलचा सरासरी दर १०८.२१ रुपये प्रति लीटरवर स्थिरावला आहे. वास्तविक पाहता, आंतरराष्ट्रीय बाजारात किमती वाढल्या होत्या तेव्हा देशातील निवडणुकांमुळे सरकारने येथील दर वाढू न देता स्थिर ठेवले होते. तसेच सरकारने इंधनावरील कर कमी केल्याने आणि त्यानंतर तब्बल चार वेळा किमती वाढवल्याने तेल कंपन्यांवर सध्या मोठा आर्थिक ताण आहे. याच कारणामुळे जागतिक बाजारात कच्चे तेल स्वस्त होऊनही भारतात तूर्तास पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणे कठीण दिसत आहे. मात्र, आगामी काळात केंद्र सरकार इंधन दरांबाबत काय मोठा निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ