Sanjay Raut On Dharmendra Pradhan Resign : तरुणांच्या लढ्यासमोर सरकारला नमावे लागले; संजय राऊतांची केंद्र सरकारवर जोरदार टीका!

spot_img

‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनाचे मोठे यश; १२ वर्षांनंतर मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा.

नीट पेपर लीक प्रकरणावरून देशभरात तापलेल्या वातावरणानंतर अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. दिल्लीतील जंतर-मंतरवर मागील महिनाभरापासून ‘कॉकरोच जनता पार्टी’ आणि देशभरातील तरुणांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनापुढे केंद्र सरकारला अखेर नमावे लागले आहे. या संपूर्ण घडामोडीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हे आंदोलन विस्कटण्यासाठी व ते परदेशातून येणाऱ्या पैशांवर चालल्याचे भासवून ते चिरडण्याचे प्रयत्न सरकारकडून केले गेले, असा गंभीर आरोप राऊतांनी केला. परंतु, गेली १२ वर्षे राजकारणात कधीही घडली नाही अशी ही घटना असून, एका जनक्षोभासमोर केंद्रीय मंत्र्याला राजीनामा देण्यास भाग पाडणारे हे ऐतिहासिक आंदोलन ठरल्याचे त्यांनी नमूद केले.

लोकशाही या देशात जवळपास संपुष्टात आली होती, मात्र या तरुण वर्गानं आणि विद्यार्थ्यांनी आपल्या रक्ताचा पाठोपाठ हाडे मोडून मिळवलेला हा लढा लोकशाहीला खऱ्या अर्थाने जीवदान देणारा आहे, अशी स्तुती राऊतांनी केली. दिल्लीसह पुणे, मुंबई आणि देशभरातल्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. अखेर उशिरा का होईना सरकारला जाग आली, असे सांगत त्यांनी तरुण वर्गाच्या जिद्दीचे कौतुक केले. तसेच, या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना भविष्यात महाराष्ट्राचे राजकारण आणि केंद्रातील समिकरणे बदलू शकतात, असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ