Strait Of Hormuz : होर्मुज खाडीत तणाव वाढला; २८ भारतीय नागरिकांच्या एलपीजी टँकरवर अनामिक हल्ला!

spot_img

इराण-अमेरिका संघर्षाची आगीची ठिणगी समुद्रावर; जागतिक ऊर्जा सुरक्षेपुढील संकट अधिक गहिरे.

इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षाचे पडसाद आता थेट सामरिकदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या होर्मुज खाडीत उमटताना दिसत आहेत. येथे मोझांबिकचा झेंडा असलेल्या आणि तब्बल २८ भारतीय नागरिक असलेल्या एका एलपीजी गॅस टँकरवर भीषण हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. फारस खाडीच्या दिशेने निघालेल्या या जहाजावर झालेल्या हल्ल्याची पुष्टी तेहरानमधील भारतीय दूतावासाने केली असून, सुदैवाने या हल्ल्यात सर्व भारतीय नागरिक सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, हा हल्ला नक्की कोणी घडवून आणला याबाबत अद्याप गूढ कायम आहे.

जगातील सुमारे २० टक्के खनिज तेल आणि गॅस याच सागरी मार्गाने वाहून नेला जातो, त्यामुळे या हल्ल्याने जागतिक स्तरावर सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण केला आहे. अमेरिका आणि इराणमधील सातत्यपूर्ण तणावामुळे या मार्गावरील व्यापारी जहाजे धोक्याच्या छायेखाली वावरत आहेत. होर्मुज खाडीतील वाढत्या अशांततेमुळे आधीच कच्च्या तेलाच्या किमतीत तेजी आली असून, हा मार्ग पूर्णपणे सुरक्षित न राहिल्यास भविष्यात जागतिक बाजारात ऊर्जा आणि तेलाचे मोठे संकट उभे ठाकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ