फलटणजवळ वाठार निंबाळकर परिसरात झालेल्या भीषण रस्ता अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून, अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, भरधाव वेगाने जाणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन नाल्याच्या कठड्यावर जोरदार आदळले. धडकेनंतर कार उलटल्याने हा भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या अन्य तिघांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जखमींच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथकाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वाहनावरील नियंत्रण नेमके कोणत्या कारणामुळे सुटले, याचा तपास सुरू आहे. अपघातामागील इतर संभाव्य कारणांचाही पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.




