Abhijeet Dipke : सरकारसोबत चर्चेपूर्वी CJP अध्यक्षांचा मोठा दावा; ‘आज संध्याकाळपर्यंत अटक होण्याची शक्यता’

spot_img

दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि CJP (कॉक्रोच जनता पार्टी) यांच्यात आज चर्चेची पहिली फेरी होणार आहे. मात्र, या बैठकीपूर्वीच CJPचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी मोठा दावा केला आहे. आज संध्याकाळपर्यंत स्वतःसह पक्षाच्या प्रमुख सदस्यांना अटक होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दिपके यांच्या म्हणण्यानुसार, CJP केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम असून त्यामुळे चर्चेतून तातडीने तोडगा निघण्याची शक्यता कमी आहे.

गेल्या 35 दिवसांपासून जंतर-मंतरवर शांततापूर्ण आंदोलन सुरू असल्याचे सांगत त्यांनी सरकारला अटकेच्या संभाव्य कारवाईवर प्रश्न उपस्थित केला. सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाईनंतर आंदोलन तीव्र झाले होते, त्याचप्रमाणे CJPच्या सदस्यांवर कारवाई झाल्यास आंदोलन आणखी व्यापक होईल, असा इशाराही त्यांनी दिला. मात्र, अटक झाली तरी समर्थकांनी कायद्याचा आदर राखत शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू ठेवावे आणि कोणताही हिंसाचार करू नये, असे आवाहन दिपके यांनी केले.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ