Dharmendra Pradhan resigns : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; नीट पेपर फुटीच्या वादावर पडदा!

spot_img

सोनम वांगचूक आणि आंदोलकांच्या तीव्र दबावामुळे मोठा राजकीय निर्णय; जंतर-मंतरवरील आंदोलनाला अखेर यश.

देशभरात गाजलेल्या ‘नीट’ पेपर फुटी प्रकरणानंतर एक अत्यंत मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’ आणि प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचूक यांच्या नेतृत्वाखाली मागील महिनाभरापासून दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर तीव्र आंदोलन सुरू होते. या आंदोलनाचा रेटा इतका वाढला की, सरकारला अखेर नमते घ्यावे लागले आहे.

पेपर फुटीच्या मुद्द्यावरून देशभरात संतापाची लाट उसळली होती आणि सातत्याने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. सुरुवातीला या आंदोलनाला संथ प्रतिसाद मिळाला, मात्र सोनम वांगचूक यांनी आमरण उपोषण सुरू केल्यावर या संघर्षाला मोठी धार आली. वांगचूक यांच्या उपोषणाचा २१ वा दिवस उजाडताच १८ जुलै रोजी पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांना आंदोलनस्थळावरून हटवले आणि रुग्णालयात दाखल केले. या कारवाईमुळे संतापलेल्या आंदोलकांनी २० जुलै रोजी संसदेवर भव्य मोर्चा काढला. या मोर्चादरम्यान झालेल्या लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्यांच्या फैरींचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले, ज्यामुळे देशभरातून या आंदोलनाला प्रचंड पाठिंबा मिळाला.

दरम्यान, शुक्रवारी सरकार आणि ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या शिष्टमंडळात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अभिजीत दिपके आणि आंदोलक आपल्या मागणीवर ठाम राहत, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय इतर कोणतीही तडजोड मान्य नसल्याचे स्पष्ट केले होते. सरकारने शनिवारी दुपारपर्यंतचा वेळ मागितला होता, मात्र त्यापूर्वीच वाढत्या दबावापुढे झुकत धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा सादर केला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ