Office Footwear : ‘या’ फुटवेअरमुळे वाढेल तुमच्या व्यक्तिमत्त्वाची शान

spot_img

आजच्या ऑफिस फॅशनमध्ये केवळ फॉर्मल कपड्यांचाच दबदबा राहिलेला नाही. अनेक महिला आता साडी, कुर्ती, सूट आणि इंडो-वेस्टर्न आउटफिट्समध्येही स्टायलिश आणि प्रोफेशनल लूक कॅरी करताना दिसतात. मात्र, फक्त आकर्षक कपडे परिधान करून लूक पूर्ण होत नाही. त्यासोबत योग्य फुटवेअरची निवड करणे तितकेच महत्त्वाचे असते. योग्य फुटवेअर तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाला उठाव देते, तर चुकीची निवड संपूर्ण लूकचा प्रभाव कमी करू शकते.

एथनिक ऑफिस लूकसाठी जूती हा सर्वाधिक पसंतीचा पर्याय मानला जातो. साधेपणा, आराम आणि पारंपरिक टच यामुळे जूती ऑफिससाठी परफेक्ट ठरते. हलक्या रंगातील किंवा मिनिमल डिझाइन असलेल्या जूती कुर्ती, पलाझो किंवा सूटसोबत आकर्षक दिसतात.

थोडासा मॉडर्न आणि क्लासी लूक हवा असेल, तर ब्लॉक हील्स उत्तम पर्याय ठरू शकतात. या हील्स स्टायलिश दिसण्यासोबतच आरामदायकही असतात. साडी, स्ट्रेट कुर्ती किंवा इंडो-वेस्टर्न ड्रेससोबत ब्लॉक हील्स सहज मॅच होतात आणि व्यक्तिमत्त्वाला एलिगंट टच देतात.

कोल्हापुरी चप्पल अजूनही एथनिक फॅशनमधील लोकप्रिय पर्याय मानला जातो. पारंपरिक डिझाइनसोबत आता त्यामध्ये आधुनिक स्टाइल्सही उपलब्ध असल्याने ऑफिस लूकमध्येही या चप्पला सहज वापरता येतात. विशेषतः कॉटन साडी आणि फ्युजन आउटफिट्ससोबत त्या आकर्षक दिसतात.

दररोज जास्त चालावे लागत असेल, तर बॅले फ्लॅट्स हा आरामदायक पर्याय ठरतो. हलके आणि साधे डिझाइन असल्याने ते ऑफिसमध्ये दिवसभर वापरण्यास सोयीचे असतात. तसेच स्ट्रॅपी सँडल्स सध्या ट्रेंडमध्ये असून, त्या एथनिक लूकला मॉडर्न आणि स्मार्ट टच देतात.

फुटवेअर निवडताना केवळ स्टाईल नव्हे तर कम्फर्टलाही प्राधान्य देणे गरजेचे आहे. हलके, कुशन सोल असलेले आणि न्यूट्रल रंगातील फुटवेअर निवडल्यास ते अनेक आउटफिट्ससोबत सहज मॅच होतात आणि ऑफिस लूक अधिक आकर्षक बनवतात.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ