Kalyan Railway Station Crime : कल्याण रेल्वे स्थानक हादरले! अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी संतापाची लाट

spot_img

मुंबईलगतच्या कल्याण रेल्वे स्थानक परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. गजबजलेल्या रेल्वे स्थानकात घडलेल्या या घटनेमुळे रेल्वे सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित मुलगी अहिल्यानगर येथून खोपोली येथे मामाच्या घरी जाण्यासाठी निघाली होती. ती कल्याण रेल्वे स्थानकावर लोकलची वाट पाहत उभी असताना सौरभ सोनावणे नावाच्या तरुणाने तिच्याशी संपर्क साधला.

आरोपीने सुरुवातीला मुलीचा मोबाईल फोन हिसकावून घेतला. मुलीने फोन परत मागितल्यानंतर “पोलीस स्टेशनमध्ये चल, तिथे फोन देतो,” असे सांगत त्याने तिला रेल्वे यार्डाच्या दिशेने नेले. निर्जन जागेचा फायदा घेत आरोपीने मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. मात्र, प्रसंगावधान राखत मुलीने आरोपीच्या तावडीतून स्वतःची सुटका केली आणि थेट रेल्वे पोलीस ठाण्यात धाव घेत संपूर्ण प्रकार सांगितला.

घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपी सौरभ सोनावणे याचा माग काढण्यात पोलिसांना यश आले आणि त्याला अटक करण्यात आली. सतत वर्दळ असलेल्या रेल्वे स्थानकात अशी घटना घडल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, स्थानिक आमदार Rajesh More यांनी या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त करत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. जलदगती न्यायालयात खटला चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ