Dahanu : धरण शेजारी, पण पाण्यासाठी वणवण; साखरे ग्रामस्थांचा हंडा मोर्चा

spot_img

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला असून साखरी धरणाच्या परिसरातील साखरे गावातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तालुक्यातील अनेक भागांना याच धरणातून पाणीपुरवठा केला जात असताना, धरणालगत राहणाऱ्या ग्रामस्थांनाच पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. नियमित आणि पुरेशा पाणीपुरवठ्याअभावी महिलांसह ग्रामस्थांना दैनंदिन गरजा भागवण्यासाठी लांब अंतरावरून पाणी आणावे लागत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी साखरी धरण परिसरात हंडा मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले. “धरण आमच्या गावाजवळ असूनही आम्हाला पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो, ही मोठी शोकांतिका आहे,” अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली. पिण्याच्या पाण्याची तातडीने व्यवस्था करून नियमित पुरवठा सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली असून या आंदोलनामुळे डहाणू तालुक्यातील पाणीटंचाईचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ