spot_img

Pomegranate or beetroot : शरीरात रक्त वाढवण्यासाठी काय आहे अधिक फायदेशीर? डाळिंब की बीट कशाचे करावे सेवन?

spot_img

आजच्या काळात माणसाला वातावरणामुळे व खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे अने‍क आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे आपल्याला शरीरात अशक्तपणा जाणवू लागतो. अशक्तपणामुळे सतत थकवा, चक्कर येणे, अशक्तपणा येऊ शकतो. या सर्व समस्यांमुळे आपल्या शरीरात रक्तकची कमतरता निर्माण होते. अशा परिस्थितीत शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढणे अत्यंत महत्वाचे आहे. तर अनेकवेळा तज्ञ तुमच्या आहारात हिमोग्लोबिन वाढवणारे पदार्थ समाविष्ट करण्याचा सल्ला देत असतात, विशेषतः डाळिंब आणि बीट हे दोन्ही रक्तवाढीसाठी महत्वाचे मानले जातात.

आयुर्वेदापासून ते मॉर्डन न्यूट्रिशनपर्यंत सगळे अशक्तपणासाठी डाळिंबाची (pomogranate) शिफारस करतात. अशातच बीटाचे सेवन हे रक्त शुद्ध करण्यासाठी महत्वाचे मानले जाते. त्यामुळे ते देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आहारात बीटचे (beetroot)सॅलड किंवा त्याचा रस दररोज प्यायल्याने लोहाची कमतरता दूर होते. त्याबरोरच शरीरात रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी डांळिब की बीट यापैकी काय अधिक फायदेशीर आहे? या संभ्रमात असाल तर आजच्या लेखात आपण याबद्दल जाणून घेऊयात.

डाळिंब (pomogranate) हे पोषक तत्वांचा खजिना आहे. ज्यात भरपूर लोह असते आणि त्यात जीवनसत्त्वे सी, ई, ए आणि अँटिऑक्सिडंट्ससह विविध पोषक तत्वे असतात. डाळिंबाचे नियमित सेवन केल्याने तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण सुधारते त्याबरोबरच नैसर्गिकरित्या हिमोग्लोबिन वाढविण्यास मदत करते. डाळिंब खाल्याने शरीरात रक्ताचे प्रमाण वाढवण्यासोबतच रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होते. डाळिंबात अँटीऑक्सिडंट्स असतात जे आपल्या त्वचेला सूर्यप्रकाशाच्या हानीकारक किरणांपासून वाचवतात आणि वृद्धत्व कमी करतात. डाळिंब मेंदूचे कार्य आणि आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी देखील फायदेशीर ठरते. त्यामुळे डाळिंब हे आहारात जरूर खावे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ